25 Jul 2026
7:00 am
3515 Hwy 90 Alt, Rosenberg, Texas, 77471
*|| पाऊले चालती पंढरीची वाट*
*मुखात विठ्ठलाचे नाम अवीट ||*
*|| तुळशी वृंदावन विठूचा तो थाट*
*वारीने सुखावला भक्तीचा हा घाट ||*
नमस्कार,
ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष मुखी, मनात दर्शनाची आस, पावलांमध्ये उत्साह, आणि तोच वारीचा मार्ग. ज्या सोहळ्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत ती आपली *आषाढी वारी* अवघ्या ३२ दिवसांवरती येऊन ठेपली आहे. मंदिर समिती आणि स्वयंसेवक आपल्या रोसेनबर्ग ला पंढरीत बदलायच्या तयारी लागले आहेत. आषाढी वारीची माहिती खालील प्रमाणे –
*तारीख – शनिवार जुलै २५*
सकाळी ६:३० ते ९:०० – आषाढी वारी
९:०० ते ९:३० – ढोल ताशा आणि रिंगण
९:३० ते १०:०० – महाआरती
१०:०० नंतर – महाप्रसाद (उपवास प्रसाद)
आषाढी वारीच्या व्यवस्थेसाठी कृपया खालील फॉर्म भरून रजिस्टर करा – https://forms.gle/
धन्यवाद
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
०६/२३/२०२६