Cultural

Vastu

Shala

Dhol Tasha

HMM Memberships & Renewals

Become Sponsor

Donate to HMM

Donate to HMM Vastu

Recurring Donation to HMM Vastu

Upcoming Events

* Members require to login first to access all Membership discounts and privileges. 

View All Events

नमस्कार ह्युस्टनकर,

ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाने यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने ६ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न केला. तब्बल १,००० हून अधिक भाविकांनी हजेरी लावून या सांस्कृतिक सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, सुंदर आरास आणि जेजुरी गडाची प्रतिकृती यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. पारंपरिक मराठी वेशभूषेत सजलेल्या भाविकांनी कार्यक्रमाची शोभा अधिक खुलवली.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा प्रारंभ झांज, ढोल-ताशा गजरात झाला. “वसा संस्कृतीचा” या संकल्पनेवर आधारित नृत्य व संगीत यांचा देखणा संगम प्रेक्षकांसमोर सादर झाला. लहानांपासून मोठ्या्ंपर्यंत सर्व वयोगटांनी सहभाग घेऊन मराठी संस्कृतीचा वारसा उजळविला.

उत्सवाची शोभा वाढवणारी ढोल-ताशा मिरवणूक, जल्लोषात सादर झालेली महाआरती आणि बाप्पाच्या नादघोषात दुमदुमलेले सभागृह हे क्षण भाविकांच्या स्मरणात कायम राहतील. शेवटी उकडीचे मोदक व साजूक तुपाची मेजवानी असलेल्या अस्सल मराठमोळ्या महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव हा मराठी समुदायाच्या एकतेचा, श्रद्धेचा आणि संस्कृतीच्या जतनाचा प्रेरणादायी सोहळा ठरला.

गणेशोत्सवात तुमच्या प्रचंड उपस्थिती आणि उत्साही सहभागाबद्दल समिती २०२५ तुमचे मनापासून आभार मानते. तुमच्या सहभागमुळे हा उत्सव खरोखरच अविस्मरणीय बनला.

पुन्हा भेटू या “शिकायला गेलो एक“ या धमाल नाटकाला ऑक्टोबर १२ दुपारी ४ वाजता, बेरी सेंटरला.

मृगेन नानोटी
अध्यक्ष, ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ- सांस्कृतिक विभाग

A Special Thanks to Our Sponsors

0
    0
    Your Cart
    Your cart is empty